॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
नम्र अवाहन

श्री क्षेत्र मढी ता.पाथर्डी जि. अहमदनगर येथे चैतन्य कानिफनाथ महाराजांचे संजीवन समाधी मंदिर आहे. सदर देवस्थान हे नवनाथापैकी असून ऎतिहासिक व जागृत असल्यामुळे सर्वांचे शक्तीस्थान आहे. येथे दररोज हजारो तर मासिक व वार्षिक उत्सवामध्ये देशविदेशातील लाखो भाविक नाथ दर्शनाचा लाभ घेतात. संत महात्मे, ऋषीमुनीसारखे नाथभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात त्या मुळे हे देवस्थान संपूर्ण भारतभरामध्ये प्रसिध्द आहे.

येथे देशविदेशातील अनेक थोर नाथभक्त चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेऊन निसर्गरम्य अशा गर्भ गिरीपर्वत परिसराची पहाणी येथील महात्म्य जाणून घेणेसाठी वांरवार श्री क्षेत्र मढी येथे येतात. श्री क्षेत्र मढी येथे येणारे नाथभक्त अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे लक्षात घेऊन, श्री कानिफनाथ देव मढी ट्रस्टतर्फे सुरु केलेल्या आजीवन अन्नदान सभासद योजनेत रुपये ११,१११/- एकवेळ जमा करुन नवनाथ भक्तांनी मोठा प्रतिसाद दिलेला असून मोठ्या संख्येने नवीन सभासद नोंदणी करीत आहेत.

सदरच्या सभासद निधीबरोबरच अनेक नाथभक्त अन्नधान्य, स्वयपाक भांडी व किराणा स्वरुपात मदत करतात. विशेष म्हणजे अन्नछत्रालयासाठी ऑस्ट्रेलियास्थित व्यवसाय करत असलेले हरियाना निवासी नाथभक्त श्री राकेश कुमार यांना नाथांचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी श्री क्षेत्र मढीचा शोध घेऊन वेळोवेळी नाथ दर्शनाचा लाभ घेत असून श्री क्षेत्र मढीतर्फे नाथभक्तांच्या सुविधेसाठी मोफत चालू असलेल्या अन्नछत्रालयासाठी आवश्यक असलेला उच्चप्रतीचा बासमती तांदुळ ते चैतन्य अन्नछत्रालयासाठी अर्पण करत आहेत. विशेष म्हणजे महाप्रसाद घेणाऱ्या नाथभक्तांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. अशा या पवित्र अन्नछत्रालयामध्ये दररोज सकाळी ११ ते दुपारी ०२ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद दिला जात आहे. येथील अन्नछत्रालयामधील महाप्रसाद घेणाऱ्या भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता अन्नछत्रालयाचे प्रशस्त हॉलमध्ये स्थलांतर केले आहे. तरी या धार्मिक कार्यासाठी दानशूर नाथ भक्तांनी रोख अथवा ऑनलाईन किंवा अन्नधान्य अथवा स्वंयपाक साहित्य स्वरुपात मदत करण्याचे अवाहन श्री कानिफनाथ ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.

दुसरे म्हणजे ऎतिहासिक अशा श्री क्षेत्र मढीदेवस्थानचे महात्म्य लक्षात घेता दिवंसेदिवस भाविकांच्या संख्येत वाढ होत चाललेली असून येथे वर्षभर विविध जाती र्धमाचे मेळावे, नवनाथपारायण, आओग्य शिबिरे, किर्तने, प्रवचन सामाजिक प्रबोधन, शालेय शिबिरे व अखंड हरिनाम सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम चालतात. सदर कार्यक्रमाबरोबरच विविध प्रांतामधून हजारोच्या संख्येने नाथ दिंड्या श्री क्षेत्र मढी येथे मुक्कामी येतात.

श्री क्षेत्र मढीला येणाऱ्या वाढत्या भाविकांच्या निवारा सुविधेसाठी भव्य असे भक्तनिवास असून पार्कींगची त्याच प्रमाणे चहा व नाश्ता सुविधेसाठी कँन्टीन सुरु करण्यात आलेली असून वाढत्या निवारा सुविधांसाठी भव्य भक्त निवास बांधकामाचा विकास आराखडा तयार केलेला असून सदर बांधकामासाठी नाथभक्तांनी सढळ हाताने देणगी दान करण्याचे अवाहन देव ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.

विविध धार्मिक कार्यक्रमा शिवाय येथे मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी नाथ दर्शनाचा लाभ घेऊन नाथ संप्रदायाचा अभ्यास करतात. येथिल निसर्गरम्य वातावरनात अनेक होतकरु विद्यार्थ्यानी मोठ्या चिकाटीने चांगल्या नोकऱ्या संपादन केलेल्या असून अनेक होतकरु विद्यार्थी स्पर्धा परिक्षेच्या तयारीत आहेत.

विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थीती नाजूक असल्यामुळे त्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध होत नाहीत हे लक्षात घेवून श्री कानिफनाथ देव ट्र्स्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळाने होतकरु विद्यार्थ्यांसाठी सेवाभावी तत्वावर वाचनालय व ग्रंथालय सुरु केलेले आहे.

गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी UPSC, MPSC‚ CET, TET, बँकीग, वन, फायरब्रिगेड, ग्रामसेवक, तलाठी आदि भरतीसाठीचे मार्गदर्शक पुस्तके तर नाथ दर्शनासाठी व अनुष्ठान भविकांना माहिती संपादन करणेसाठी गीता, ज्ञानेश्वरी, नवनाथ संबधीत ग्रंथ तसेच ग्रंथालयासंबधीत साहित्य चैतन्य वाचनालयास अर्पण करण्याबद्दलचे अवाहन श्री कानिफनाथ ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे श्री कानिफनाथ मंदिराचे बांधकाम छत्रपती शाहू महाराज यांचे आज्ञेवरुन त्यांचे सरदार चिमाजी सावंत यांचे देखरेखीखाली १७ व्या शतकात पूर्ण झालेले आहे. सदर बांधकामास अनेक वर्षे होऊन गेलेले आहेत. अशा ऎतिहासिक गड बांधकामाची व ऎतिहासिक बारवांची अनेक ठिकाणी तुटफूट झाल्यामुळे भविष्यात प्राणहानी होऊ नये हे लक्षात घेऊन कार्यरत विश्वस्त मंडळाने जिर्णोध्दराचे काम हाती घेतलेले आहे.

जिर्णोध्दराबरोबरच मंदिर परिसरातील बहुउद्देशिय सभामंडप, भक्तनिवास, प्रथमोपचारकेंद्र, आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, दिशादर्शक कमान, मंदिर परिसरातले पारंपारिक रस्ते, स्वछतागृह, वाहनतळ, बागबगिचा, ध्यानसाधणा व योगाभ्यास हॉल, पारायण हॉल, नाथवस्तु संग्रहालय, व वसतीगृहासारख्या अनेक विकासकामे विचारधिन व प्रस्तावित आहेत.

तरी चालू असलेल्या विकास कामांसाठी व प्रस्तावित योजनांसाठी नाथ भक्तांनी सढळ हाताने श्री कानिफनाथ महाराज चरणी देणगी दान करण्याचे अवाहन श्री कानिफनाथ देव ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.

 
भट्टी सण
(दि. ७ मार्च २०१९)
तेल लावणे
(दि. १० मार्च २०१९)
कळस उतरविणे
(दि. १३ मार्च २०१९)
कळस चढविणे
(दि. १६ मार्च २०१९)
मानाची काठी व होळी
(दि. २० मार्च २०१९)
नाथसमाधी दिन सोहळा
(दि. २५ मार्च २०१९)
निशाण (कावडी) प्रस्थान
(दि. ०१ एप्रिल २०१९)
फुलबाग यात्रा
(दि. ०५ एप्रिल २०१९)
गुढीपाडवा महोत्सव
(दि. ०६ एप्रिल २०१९)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका