॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी

ब्रह्मचैतन्य कानिफनाथ महाराजांची संजिवन समाधी मढी येथे आहे. या ठिकाणास हिंदू धर्मातील आद्यनाथ पिठ ही समजले जाते. अखिल भारतीय भटक्या व निमभटक्या जाती जमातीचे कुलदैवत म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे.

या तीर्थक्षेत्रास "ब" वर्ग दर्जा प्राप्त असून या ठिकाणी होळी ते गुढीपाडव्या पर्यंत यात्रा महोत्सव असतो तसेच रंगपंचमी हा नाथांचा समाधिदीन असल्यामुळे त्या कालावधीत प्रतिवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. १५ दिवसांच्या यात्रेच्या कालावधीत प्रतिवर्षी महाराष, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यांतून साधारणपणे १२ ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात.

श्री क्षेत्र मढी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळा (२५ जून २०१४ रोजी प्रस्थान)
गुरुपौर्णिमा (१२ जुलै २०१४)
श्रावणी तिसरा शुक्रवार पालखी मिरवणूका (१५ ऑगस्ट २०१४)
नवरात्र उत्सव (२५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१४)
कोजागीरी पौर्णिमा (०७ ऑक्टोबर २०१४)
दिपावली लक्ष्मीपूजन (२३ ऑक्टोबर २०१४)
भाऊबीज (२५ ऑक्टोबर २०१४)
गोरक्षनाथ प्रगटदिन (०५ नोव्हेंबर २०१४)
मढी ते मायंबा रस्त्याचे काम पूर्ण

नवीन दर्शनबारी इमारतीचे काम पूर्ण

मंदिर परिसरातील पथदिव्यांचे काम पूर्ण

वाहन पार्कींग व मंदिर जोड रस्ता काम चालू आहे.

५० लाख रुपये सभामंडपाचे काम प्रगतीपथावर

वाहनतळाचे काम पूर्ण

मढी-तिसगाव रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण प्रगती पथावर

मंदिर जोड रस्ता कॉंक्रीटीकरण पूर्ण