॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
श्री क्षेत्र मढी
खास वैशिष्टे देवस्थानाशेजारील तिर्थक्षेत्रे

श्री क्षेत्र मढी येथील खास वैशिष्टे

कानिफनाथ महाराजांनी सर्व जाती धर्माच्या जनकल्याणाकरीता उत्तर हिंदुस्थान व संपूर्ण भारतभर धर्मजागृती व भ्रमण करुन शुध्द हवाई मार्गाचा, गुणकारी पाणी असलेल्या झऱ्यांचा तसेच औषधी वनस्पतींचा अभ्यास करुन नैसर्गिक ठेवा असणाऱ्या गर्भागिरी परिसरामध्ये पौनागिरी नदीकाठी श्री क्षेत्र मढी येथे वेळ, काळ, स्थान व दिशा निर्धारीत करुन वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व देवीदेवतांच्या महायज्ञात ठरल्याप्रमाणे समाधी घेतली. त्यामुळे आजही अनेक भाविक सर्व वैद्यकीय इलाजात अपयशी ठरल्यानंतर दैवी शक्ती व नाथांच्या अदृष्य शक्तीमुळे तसेच गुणकारी पाणी व शुध्द हवेचा ठेवा असणाऱ्या मढी गडावर नाथांच्या दर्शनाने व वास्तव्याने बरे होतात.

त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्व तंटे कुठल्याही न्यायालयात न जाता कानिफनाथ महाराजांवरील श्रध्देमुळे त्याना साक्षी मानुन मिटविले जातात त्यामुळे अनेक जाती धर्माचे हे सर्वोच्च न्यायालय समजले जाते व शासनानेसुध्दा हाच आधार घेउन तंटामुक्ती उपक्रम केला असावा असे वाटते.

दुसरे म्हणजे नैसर्गिक प्रकृतीला घालुन दिलेले निर्बंध आजही निसर्गाकडुन पाळले जातात त्यामुळे याठीकाणी इंगळी दंशाने कुठलीही वेदना जाणवत नसून या भागातील आयुर्वेदीक दवना वनस्पतीला फुलबाग परीसरात जो सुगंध आहे ते इतरत्र कुठेच नाही तसेच अतिदुष्काळी परिस्थितीतसुध्दा नाथ स्नानकुंड झऱ्यास पाणी राहत असल्यामुळे या भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास याठिकाणी जाऊन नाथांना घातलेल्या साकड्यामुळे निश्चित स्वरुपात वृष्टी झाल्याचे उदाहरणे आहेत. नाथांच्या शक्तीची अनुभुती आलेया नाथभक्तांकडून वर्षभरातुन एक वेळ समाधीस्थळाला भेट देवून पंचधातुचे ताईत भरुन घेतले जातात व वर्षभर देव्हाऱ्यामध्ये ठेवून पुजा पाठ केल्यामुळे घरामध्ये सदैव सुख शांती मिळत असल्याबद्दल अनेक नाथभक्तांकडून केले जाते त्याचप्रमाणे नाथयंत्रे शंख, डमरु, चिमटा, खडवा, मेखला, शिंगी, सारंगी, कुंडल, कमंड्लु, कुबडी-फावडी, घुंगरु, रुद्राक्ष माळा, कंगण, गोपीचंद, अष्टीगंध, भिक्षा पात्र, मंत्र तंत्र यंत्र, डफ व नवनाथ ग्रंथ इत्यादी धार्मिक पुस्तके वाचनाने व हातळल्याने तसेच अभ्यासाने जिवनात सुख समृध्दी मिळते.

रितीरिवाजाप्रमाणे नाथांच्या मंदिरास भगवा रंग असल्यामुळे श्री क्षेत्र मढी गावात बैलपोळ्यास बैलाना हिंगुल व बेगड लावत नाहीत त्याचप्रमाणे काही शापीत जमाती उदा. ब्राम्हण, कोळी, धोबी, लोहार, कुंभार, शिंपी जमातीचे लोक आनंदाने राहू शकत नाहीत त्यामुळे ते याठीकाणी कायमचे वास्तव्य करत नसून व्यवसायासाठी शेजारील गावाचा आसरा वर्षानुवर्षे घेत आहेत.

नाथांच्या समाधी स्थानाचा मान राखून या गावामध्ये दुमजली इमारती बांधली जात नाही. नाथांनी त्रिशूळकाठी बांबुची असल्याने या परीसरामध्ये घराला बांबु वापरत नाहीत व रितिरिवाजाप्रमाणे पथ्य न पाळल्यास त्या कुटुंबाना अनेक आपत्तीना तोंड द्यावे लागते त्यामुळे वरील परंपरेची भिती बाळगून परिसरामधील नाथभक्त गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे येथे नाथांची सेवा करुन धन्य होत आहेत.
 
भट्टी सण
(दि. ७ मार्च २०१९)
तेल लावणे
(दि. १० मार्च २०१९)
कळस उतरविणे
(दि. १३ मार्च २०१९)
कळस चढविणे
(दि. १६ मार्च २०१९)
मानाची काठी व होळी
(दि. २० मार्च २०१९)
नाथसमाधी दिन सोहळा
(दि. २५ मार्च २०१९)
निशाण (कावडी) प्रस्थान
(दि. ०१ एप्रिल २०१९)
फुलबाग यात्रा
(दि. ०५ एप्रिल २०१९)
गुढीपाडवा महोत्सव
(दि. ०६ एप्रिल २०१९)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका