॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
श्री क्षेत्र मढी
खास वैशिष्टे देवस्थानाशेजारील तिर्थक्षेत्रे

श्री क्षेत्र मढी देवस्थानशेजारील तिर्थक्षेत्रे

श्री क्षेत्र मोहटा
श्री क्षेत्र माहुरची रेणुका बालिकेच्या रुपात येवून मोहटा गडावर देवीच्या मुर्तीचा स्वयंभु तांदळा प्रगट झाला व याच रेणुका देवीला जगदंबा देवी या नावाने ओळखले जाऊ लागले. जगदंबा देवी अनेक भाविकांच्या नवसाला पावल्यामुळे दिवसेंदिवस श्री क्षेत्र मोहटा येथे भाविकांच्या संख्येत वाध होत आहे त्याच्प्रमाणे श्री क्षेत्र जगदंबा देवी हे साडेतिन पिठापैकी एक पिठ मानले जाते. श्री क्षेत्र जगदंबा देवी गड श्री क्षेत्र मढी येथून १८ कि.मी. अंतरावर असून येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो व विजयादशमीला भव्य यात्रा महोत्सव भरतो.

श्री क्षेत्र वृध्देश्वर
श्री क्षेत्र वृध्देश्वर हे श्री क्षेत्र मढी येथून १६ कि.मी. अंतरावर असून या ठिकाणी महादेव शंकराची स्वयंभू पिंड आहे. या ठिकाणी झालेल्या देवी देवतांच्या महायज्ञात ठरल्याप्रमाणे नाथांनी संजीवन समाध्या घेतल्या आहेत व या ठिकाणी बाराही महिने शिवलिंगातून पाणी पाझरते. या ठिकाणी अनेक औषधी वनस्पती आढळुन आल्यामुळे शासनाने या ठिकाणाला निसर्ग परिचय केंद्र घोषीत केकेले आहे.

श्री क्षेत्र हनुमान टाकळी
या ठिकाणी समर्थ रामदास स्वामीनी स्थापन केलेली उत्तरमुखी हनुमानाची भव्य मुर्ती असून अमावस्येच्या आदल्या दिवशी अनेक पिडीत भाविक विस्तवावर चालून जातात व त्यामुळे त्यांना आरोग्य सुख मिळते. क्षेत्र हनुमान टाकळी हे श्री क्षेत्र मढी येथून १२ कि.मी. आहे.

श्री क्षेत्र धामण गाव
श्री क्षेत्र धामणगाव येथे रेणुका माता (माहूर निवासनी) देवीची स्वयंभू तांदळा असून इतर देवींचे तोंड बंद असते मात्र धामणगाव देवीचे तोंड उघडे आहे तसेच या ठिकाणी हातात धणुष्यबाण घेतलेली परशुरामाची मुर्ती आहे. मंदिराला उत्तरेला प्राचीन बारव असून त्यावर अनेक शिलालेख आहेत.

श्री क्षेत्र गणपती अव्हाणे
श्री क्षेत्र अव्हाणे येथे तिन फुट खोल निद्रा अवस्थेत गणपतीची स्वयंभु मुर्ती असून सदर मंदिराचे बांधकाम २५० वर्षापूर्वी राजे शाहू महाराजांच्या काळात हेमाडपंथी दगडात झालेले आहे. श्री क्षेत्र अव्हाणे येथे भाविकांच्या सुविधेसाठी भक्तनिवास, स्वच्छतागृहाची सुविधा असून या ठिकाणी प्रत्येक संकष्ठ चतुर्थीला अभिषेकपुजा, किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो.
 
भट्टी सण
(दि. ७ मार्च २०१९)
तेल लावणे
(दि. १० मार्च २०१९)
कळस उतरविणे
(दि. १३ मार्च २०१९)
कळस चढविणे
(दि. १६ मार्च २०१९)
मानाची काठी व होळी
(दि. २० मार्च २०१९)
नाथसमाधी दिन सोहळा
(दि. २५ मार्च २०१९)
निशाण (कावडी) प्रस्थान
(दि. ०१ एप्रिल २०१९)
फुलबाग यात्रा
(दि. ०५ एप्रिल २०१९)
गुढीपाडवा महोत्सव
(दि. ०६ एप्रिल २०१९)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका