॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
नाथसंप्रदाय
॥ अलख निरंजन ॥
॥ आदेश ॥

हरीची संकल्पना / योजना-
कलियुगाच्या प्रारंभी लक्ष्मीनारायणाने नवनारायणांना द्वारकेस बोलावून त्यांचा आदर सत्कार केला व नवनारायणांनी भूतलावर अवतार घ्यावे असे सूचित केले. त्याप्रमाणे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धि, पिप्पलायन, अविर्होत्र (ऐरहोत्र), चमस, द्रुपिल(धुवमीन) आणि करभाजन असे नवनारायणांनी अवतार घेतले.

माश्याच्या उदरामध्ये कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट झाले. शंकराच्या त्रितिय नेत्रापासून जो अग्नी निर्माण झाला त्याच्या जठरी अंतरिक्ष नारायणाने ज्न्म घेऊन जालिंदरनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. ब्रम्हदेवाच्या विर्याचा अंश रेवा तीरी पडला त्यामधून चमसनारायणाने, रेवणसिद्ध या नावाने जन्म घेतला. सर्पिणीच्या उदरात अविर्होत्र नारायणाने प्रवेश करुन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट झाले.

मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडले व त्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पायी रगडलेल्या वीर्यातून कुशबिटामध्ये पिप्पलायन नारायण यांनी चरपटीनाथ या नावाने जन्म घेतला. भर्तरी या नावाच्या कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रात धृवमीन नारायणाने संचार करुन भतृहरी- भार्तरीनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. हत्तीच्या कानात पडलेल्या वीर्यात प्रबुद्ध नारायणाने प्रवेश करुन कानिफनाथ या नावे जन्म घेतला. गोरक्षनाथाने मातीचा पुतळा तयार केला व त्याच बरोबर त्याचा संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता. त्या पुतळ्यामध्ये करभाजन नारायणाने प्रवेश केला व गहिनीनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

याप्रमाणे नवनारायणांनी नवनाथ रुपाने जन्म घेतला व नाथ संप्रदायाची सुरुवात झाली.
 
भट्टी सण
(दि. ७ मार्च २०१९)
तेल लावणे
(दि. १० मार्च २०१९)
कळस उतरविणे
(दि. १३ मार्च २०१९)
कळस चढविणे
(दि. १६ मार्च २०१९)
मानाची काठी व होळी
(दि. २० मार्च २०१९)
नाथसमाधी दिन सोहळा
(दि. २५ मार्च २०१९)
निशाण (कावडी) प्रस्थान
(दि. ०१ एप्रिल २०१९)
फुलबाग यात्रा
(दि. ०५ एप्रिल २०१९)
गुढीपाडवा महोत्सव
(दि. ०६ एप्रिल २०१९)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका