॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
उत्सव
तिथि प्रमाणे वार्षिक उत्सव इतर उत्सव

फुलबाग यात्रा

अख्यायिकेप्रमाणे फाल्गुनी अमावस्या हा नाथांचा प्रगट दिन आहे. प्रगट दिन म्हणजे समाधी घेतल्यानंतर भाविकभक्तांच्या कल्याणासाठी नाथ भुतलावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात शके १७१० पर्यंत भ्रमण करुन फाल्गुनी अमावस्येला पुन्हा आपल्या जागेवर समाधीस्त झाले म्हणून या पवित्र दिवसाला फार महत्व असून रंगपंचमी हा समाधी दिन व फाल्गुनी अमावस्या हा प्रगट दिन समजला जातो.

गुरुंच्या आदेशाने समाधी घेण्यासाठी नाथ जेव्हा उत्तर हिंदुस्थानातुन दक्षिण हिंदुस्थानात भ्रमण करीत येत असताना निवडुंगे आणि मढी या दोन्ही गावाच्या सिमेवर आमराई वनात नाथ जेव्हा विश्रांतीसाठी थांबले तेव्हा त्या ठिकाणी दवना व सुगंधीत फुले प्रगट होवून फुलांची बाग तयार झाली म्हणून या ठिकाणावर त्या दिवसापासून यात्रा भरण्यास प्रारंभ होऊन या यात्रेस फुलबाग यात्रा असे नाव पडले त्याच बरोबर या ठिकाणच्या जवळून वाहणाऱ्या नदीमध्ये नाथानी स्नान केल्यामुळे ही नदी पावन होउन तिचे नाव पावणगंगा / पौनागिरी पडले.

छत्रपती शाहू महाराजानी गडाचे व मंदिराचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर नाथांच्या प्रगट दिनी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी वेदशास्त्र पंडित गंगाराम शास्त्री दिक्षित पैठणकर यांच्या शुभ हस्ते गंगाजल आणून नाथांना महास्नान घातले व दुसऱ्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे महाभिषेक, होमहवन करुन शिवछत्रपतींच्या पंरपरेनुसार नगारावाद्य, पुजाआरती इत्यादी प्रथा सुरु केल्या.
निशाण भेट

पंरपरेनुसार फाल्गुनी अमावस्येच्या तीन दिवस अगोदर म्हणजे पापमोचनी एकादशीच्या दिवशी कानिफनाथ देव ट्रस्टमार्फत पुजारी, ग्रामस्थ व नाथभक्त नाथांचे भव्य निशाण घेऊन कावडीने पायी गंगाजल घेऊन येण्यासाठी पैठणला जातात. फाल्गुनी अमावस्येच्या आदल्या रात्री म्हणजे चतुर्थीला तिसऱ्या प्रहरी संपूर्ण गडावर शांती झाल्यानंतर विश्वस्त, पुजारी व ठराविक जेष्ठ नागरीकांच्या उपस्थितित नाथांच्या संजीवनी समाधीचा वर्षभर वाढलेला चंदन उटीचा लेप म्हणजे मळी काढून मळी स्वच्छ केली जाते व समाधीची मळी काढण्याचा हा वर्षातील एकमेव दिवस असतो. या पवित्र मळीमध्ये भस्म व पंचामृत टाकून ती वर्षभर नाथभक्ताना दिली जाते.

दुसऱ्या दिवशी म्हणजे फाल्गुनी अमावस्येला पैठणवरुन गंगाजल घेऊन वाजत गाजत पायी आलेल्या कावडी नाथानी विसावा घेतलेल्या ठिकाणी सकाळी १० वाजता आलेल्या कावडी सांयकाळी ०४ वाजेपर्यंत फुलबागेत विसावा घेण्यासाठी थांबतात म्हणून त्या कालावधीत यात्रेचे स्वरुप येते.

विसाव्यासाठी थांबलेल्या कावडीकरांना गंगाजलाने समाधीस्नान करवियाकरिता घेऊन येण्यासाठी गडावरुन नाथांची पालखी, पंचधातुचा घोडा, अब्दागीरी व भव्य निशाण घेऊन मा. विश्वस्त व ग्रामस्थ भाविकांसमवेत वाजत गाजत त्यांच्या स्वागतासाठी गेल्यानंतर दोन्ही निशाणाचीभेट लक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ भेट होते त्यावेळी मानाच्या पाच (मढी, पैठण, सावर गाव, मिरी (निवडूंगे, हात्राळ, साकेगाव, मा. बाभुळ गाव, का. पिंपळ गाव, सुसरा यांची मिळून एक) गावाच्या कावडीच्या निशाणाची भेट मानाप्रमाणे होते. त्यांच्या मानाच्या वादातुन कावडीकरात वाद होण्याची शक्यता असते म्हणून हि निशाण भेट पोलीस बंदोबस्तामध्ये विश्वस्तांकडून केली जाते.

कावडी घेऊन ज्यावेळी कावडीकर गडावर येतात त्यावेळी लहान मुले कावडीकरांची वाट पवित्र व्हावी म्हणून लोटागंण घेतात व नाथांचे गाणे गातात.
कान्होबा देव रागात !
कावडी फुलर बागात !
कन्होबा देव खडकात !
वरती निशाण फडकत !
कान्होबा देव सत्याचा !
समाधीवर भगवा मोत्याचा !
नाथा मला तुझा छंद !
कपाळी केशर गंध !
अशा प्रकारेचे पारंपारीक कवणे गावून नाचत व वाजत गाजत नाथांच्या संजीवनी समाधीला महास्नान घातले जाते हा सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत चालतो त्यानंतर पंरपंरेनुसार संजीवन समाधीला चंदन उटी, गोरोचन, गर्भागिरी परीसरातील पुजनिय वनस्पती, पंचामृत, दवना यांचे मिश्रण करुन लेप चढविला जातो.
हा समाधीला लेप चढविण्याचा वर्षातील एकमेव पवित्र दिवस असतो. त्यानंतर मा. विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीमध्ये प्रमुख नाथभक्तांच्या हस्ते महापुजा व होमहवन केले जाऊन नव वर्षाचे मोठ्या आनंदाने स्वागत केले जाते.
 
भट्टी सण
(दि. ७ मार्च २०१९)
तेल लावणे
(दि. १० मार्च २०१९)
कळस उतरविणे
(दि. १३ मार्च २०१९)
कळस चढविणे
(दि. १६ मार्च २०१९)
मानाची काठी व होळी
(दि. २० मार्च २०१९)
नाथसमाधी दिन सोहळा
(दि. २५ मार्च २०१९)
निशाण (कावडी) प्रस्थान
(दि. ०१ एप्रिल २०१९)
फुलबाग यात्रा
(दि. ०५ एप्रिल २०१९)
गुढीपाडवा महोत्सव
(दि. ०६ एप्रिल २०१९)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका