॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
उत्सव
तिथि प्रमाणे वार्षिक उत्सव इतर उत्सव

श्री क्षेत्र मढी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळा

मढी येथून गेल्या १७ वर्षापासून चैतन्य कानिफनाथ महाराज यांची पालखी दिंडी पायी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने जाते. या पालखी दिंडी मध्ये महाराष्ट्रभरातून अनेक नाथभक्त सामिल होतत व ज्या मार्गाने हि दिंडी जाते त्या मार्गावर नाथांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक एकत्र होऊन दिंडीमधील सर्व नाथभक्तांचे स्वागत करुन अन्नदान करतात.

नागपंचमी कुस्ती हंगामा सोहळा

कुस्ती खेळाची ग्रामीण मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून सालाबादाप्रमाणे श्री क्षेत्र मढी येथे नागपंचमी सणाच्या दिवशी कुस्ती हंगामा भरविला जातो. या हंगाम्यात नगर जिल्हा व परिसरातील अनेक नवजवान पहिलवानांच्या कुस्त्या होतात व यामध्ये अनेक नामवंत पहिलवान त्यांच्या डावपेचांचा खेळ दाखवून प्रेक्षकांना खूष करतात.

श्रावणी शुक्रवार पालखी मिरवणूक

सालाबादप्रमाणे श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ गडावरुन नाथांची पालखी मिरवणूक काढली जाते. परंतू तिसऱ्या शुक्रवारी अनेक नाथभक्ताना दृष्टांत झाल्याची महती असल्यामुळे या दिवशी या पालखी सोहल्याचे जास्त महत्व असते या दिवशी चैतन्य कानिफनाथ भक्तमंडळ लोणावळा या ठिकाणाहून पायी कावडीने पाणी आणले जाते व देवस्थान पुजाऱ्यांमार्फत नाथांच्या समाधीला गंगास्नान घालून नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक केला जातो.

दिवसभराच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राशिवाय आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेशातुन लाखो भाविक सहभागी होतात व नाथांचे प्रतिक म्हणून देव्हाऱ्यामधील ताईत भरुन घेतात.

या दिवशी प्रामुख्याने कुलदैवत मानणाऱ्या नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळा, मुंबई, औरंगाबाद या भागातील नाथभक्त मोठ्या उत्साहाने डफ वाजवून या मिरवणूकीचा आनंद घेतात त्याचप्रमाणे अनेक बँड पथक स्वखर्चाने सांस्कृतीक कर्यक्रम करतात व सांयकाळी देवस्थान व भाविकांतर्फे शोभेची दारु उडविली जाते यावेळचे दृष्य पाहण्यासारखे असते. या पालखी मिरवणूकीमध्ये नाथांचा घोडा व पादुका ठेवून पालखी मिरवणूक काढली जाते आणि विषेश म्हणजे नाथ महाराज हे अदृष्य रुपाने अनेक नाथ भक्ताना दर्शन देतात असे समजले जाते त्यामुळे या पालखी मिरवणूकीला एक आगळेवेगळे महत्व आहे.
 
भट्टी सण
(दि. ७ मार्च २०१९)
तेल लावणे
(दि. १० मार्च २०१९)
कळस उतरविणे
(दि. १३ मार्च २०१९)
कळस चढविणे
(दि. १६ मार्च २०१९)
मानाची काठी व होळी
(दि. २० मार्च २०१९)
नाथसमाधी दिन सोहळा
(दि. २५ मार्च २०१९)
निशाण (कावडी) प्रस्थान
(दि. ०१ एप्रिल २०१९)
फुलबाग यात्रा
(दि. ०५ एप्रिल २०१९)
गुढीपाडवा महोत्सव
(दि. ०६ एप्रिल २०१९)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका