श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी

तालुका- पाथर्डी, जिल्हा- अहमदनगर महाराष्ट्र - ४१४ १०६

जगभरामध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद व सामाजिक जबाबदारी म्हणून श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्री क्षेत्र मढी येथे नाथदर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी कृपया याची नोंद घेऊन देवस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे... अधिक माहिती करता..

श्री क्षेत्र मढी

ब्रह्मचैतन्य कानिफनाथ महाराजांची संजिवन समाधी मढी येथे आहे. या ठिकाणास हिंदू धर्मातील आद्यनाथ पिठ ही समजले जाते. अखिल भारतीय भटक्या व निमभटक्या जाती जमातीचे कुलदैवत म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे.

या तीर्थक्षेत्रास "ब" वर्ग दर्जा प्राप्त असून या ठिकाणी होळी ते गुढीपाडव्या पर्यंत यात्रा महोत्सव असतो तसेच रंगपंचमी हा नाथांचा समाधिदीन असल्यामुळे त्या कालावधीत प्रतिवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. १५ दिवसांच्या यात्रेच्या कालावधीत प्रतिवर्षी महाराष, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यांतून साधारणपणे १२ ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात.

अधिक माहिती

आगामी उत्सव

जगभरामध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद व सामाजिक जबाबदारी म्हणून श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्री क्षेत्र मढी येथे नाथदर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी कृपया याची नोंद घेऊन देवस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे... अधिक माहिती करता..

घडामोडी

 • वृद्ध व अपंग भाविकांसाठी  लिफ्ट सुविधा
 • मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ
 • नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा
 • नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा
 • नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप
 • परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा
 • दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद 
 • परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा
 • नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये
 • गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप
 • भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय 
 • मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन
 • अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल
 • होमहवन व अभिषेक पूजा सुविधा
 •  अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका

नम्र आवाहन

नाथभक्तांना अवाहन करण्यात येते की, नाथभक्तांच्या सुविधेसाठी चालू असलेल्या विकासकामांसाठी देणगी जमा करुन धार्मिक कार्यात सहभागी होणेस विनंती.

संस्थेला प्रत्यक्ष भेट न देता आपण खालील बँक खात्यामध्ये आपल्या सुविधेप्रमाणे ऑनलाईन देणगी जमा करुन किंवा संस्थेच्या खात्यात चेक जमा करून देणगी देऊ शकता.

अधिक माहिती साठी