श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी

तालुका- पाथर्डी, जिल्हा- अहमदनगर महाराष्ट्र - ४१४ १०६

देवस्थानातील मंदिरे

श्री मच्छिंद्रनाथ मंदिर
नाथ सांप्रदायाचे पहिले नाथ श्री मच्छिंद्रनाथांचे येथे छोटेसे मंदिर असून असंख्य भाविकांची श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण होते.

 

श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर
मुख्य मंदिराच्या पश्चिमेला श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर असून तळघरात शिवपिंड आहे हे मंदिर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधण्यात आलेले आहे.

 

श्री नवनाथ मंदिर
श्री कानिफनाथ गडावर आलेल्या भाविकांना नवनाथाचे दर्शन घशावे म्हणून मुख्य मंदिराच्या पश्चिम बाजूस नवनाथ मंदिर बांधण्यात आलेले आहे. तसेच या ठिकाणी नवनाथ पारायण केले जाते.

 

श्री आद्यशिष्य मंदिर
श्री कानिफनाथ समाधी घेतेवेळी त्यांचे बरोबर सात शिष्य होते पैकी दोन मुख्य शिष्यांचे मंदिर बांधण्यात आले यामधे गुरु श्री जालिंद्रनाथ महाराज गुप्त रुपाने वास्तव्य करत आहेत.

 

गादीघर
समाधी मंदिराच्या दक्षिण बाजुला नाथांचे विश्रांती ठिकाण आहे. श्री कानिफनाथ महाराज रोज आरतीनंतर गादीघरात विश्रांतीसाठी जातात त्यासाठी गादीघरामध्ये नाथांचा पलंग असून गादीघरापुढे दगडावर कोरीव नागफण्यांचे सिंहासन आहे.

 

श्री विष्णु मंदिर
श्री कानिफनाथ महाराज श्री विष्णुचे भक्त होते त्यामुळे गादीघराच्या पाठीमागील बाजुस दगडी फर्शीवर भव्य अशी भगवान विष्णुची मुर्ती उभी आहे. मुर्तीस चार हात असून शंख, चक्र, गदा ही मुर्तीच्या हातामध्ये आहे तसेच दोन्ही पायांच्या बाजुला देवतांच्या प्रतिकॄती कोरीव असून दशावताराचे रेखीव चित्र कोरलेले आहे.